Expereince of Intermittant Fasting

मी एका  IT कंपनीत Talent  Acquisition डिपार्टमेंट    मध्ये Assistant Manager म्हणून कार्यरत आहे. कामाचा प्रचंड ताण , प्रत्यक्ष वर्षी स्वतःला prove  करण्यासाठीची  धडपड, घरातलं  सांभाळा. हे सगळं करता करता मला २०१६ ला डायबेटिस झाला. २०१९ ला मला थायरॉईडचा त्रास सुरु झाला. माझा वजन हि वाढत होत, पण वेळ नव्हता स्वतःकडे बघण्याचा. 
ह्या lock down मुळे बऱ्यापैकी वेळ मिळाला स्वतःकडे बघायचा. मार्च २०२० मध्ये आम्ही  फॅमिली पिकनिक करून आलो आणि lockdown  सुरू झालं. सगळे डाएटचे  व्हिडिओ पहिले. Thomas  Delaure एक youtuber  आहे आणि त्याचे विडिओ खूप इन्स्पिरेशनल आहेत . 
थॉमस च्या व्हिडिओमुळे मी स्वतःच्या शरीराला समजू शकले ,माझ्या  आजाराला समजू शकले. त्याने एका  व्हिडिओत  शुगर कशी कंट्रोल आणू शकता Intermittant Fasting करून  हे सांगितलं. आतापर्यंत ज्या ज्या डॉक्टर कडे गेले त्यांनी वजन कमी करायला  सांगितले, खूप प्रयत्न केले वेगळे डाएट केले. प्रत्येक डाएट बरोबर तुमची हालचाल होणं गरजेचं आहे. मला ह्या दोन्ही आजारामुळे कधी काही करायचा उत्साह राहिला नव्हता. थोडंफार वजन कमी व्ह्याचा आणि पुन्हा वजन आहे तसंच  🙁
१ एप्रिल २०२० ला मी ठरवलं intermittant फास्टिंग करायचं. मी १६:८ ह्या पद्धतीने डाएट सुरु केल. एप्रिल ते जून पर्यंत  मी ५ किलो वजन कमी केल. महत्वाचं म्हणजे माझी शुगर कंट्रोल मध्ये आली. 
मी माझा अनुभव तुमच्याबरोबर share केलाय , ह्या दोन महिन्यात मी सातत्याने माझी शुगर चेक करत होते, म्हणूनच जाणवलं कि हळूहळू शुगर कंट्रोल मध्ये येते 
 

Comments (8) on "Expereince of Intermittant Fasting"

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *